पुणे जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांचे झेडपीसमोर धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्वरित मानधन अदा करण्याचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. अन्य मागण्यांमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा स्वयंसेविकांना वाईट वागणूक दिली जात आहे.

पुणे : कोरोनाच्या काळात सर्वेक्षणाचे काम करत असलेल्या सर्व आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना सरसकट दरमहा अनुक्रमे दोन हजार व तीन हजार रुपयांचे मानधन देण्यात यावे, हे मानधन त्वरित वितरित करावे आणि बैठकांसाठी अतिरिक्त मानधन द्यावे, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी शुक्रवारी (ता.4) जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्वरित मानधन अदा करण्याचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. अन्य मागण्यांमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा स्वयंसेविकांना वाईट वागणूक दिली जात आहे. यामध्ये त्वरित सुधारणा करण्यात यावी, गट प्रवर्तकांचे मानधन निश्‍चित करून द्यावे, शारदाग्राम योजनेचे पूर्ण वर्षाचे मानधन देण्यात यावे आदींचा समावेश आहे.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली
महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक युनियनच्या पुणे जिल्हा शाखेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षा स्वाती धायगुडे, सरचिटणीस श्रीमंत घोडके, सीमा मालुसरे, हर्षा ढमाळ, सुजाता प्रधान, सारिका खुळे, मनीषा कारंजकर, उज्ज्वला डांगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asha swayamsevaks protest in front of ZP in Pune district