Ashadhi Wari : फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनी यवतमध्ये पालखीत धरला ठेका

फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषावर ठेका धरला अन् सर्वांनाच त्याचे कौतुक वाटले.
France Students in Palkhi
France Students in PalkhiSakal
Summary

फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषावर ठेका धरला अन् सर्वांनाच त्याचे कौतुक वाटले.

केडगाव/ यवत - फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषावर ठेका धरला अन् सर्वांनाच त्याचे कौतुक वाटले. ‘वारी ही आमच्यासाठी अमेझिंग असून, वारीत चालून आम्ही वारी एन्जॅाय केला आहे.’ असे फ्रान्सच्या त्यांनी नमुद केले.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने शनिवारी दौंड तालुक्यात बोरीभडक येथून प्रवेश केला. पालखी सोहळा कासुर्डी हद्दीत आला, तेव्हा कासुर्डीत दीपगृह सोसायटीत अभ्यास सहलीला आलेल्या फ्रान्सच्या आठ विद्यार्थिनी आणि चार विद्यार्थ्यांनी वारीत सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी कपाळी व गालावर गंध लावला. या विद्यार्थ्यांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि ते वारीत चालले. यावेळी त्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषावर ठेका धरला. वारीत चालताना हे विद्यार्थी भारावून गेले होते. वारकऱ्यांनी त्यांच्याबरोबर सेल्फी काढले.

दीपगृह संस्थेतील राजेश निंबाळकर यांनी वारीबद्दलची माहिती या विद्यार्थ्यांना दिली. ‘सकाळ’शी बोलताना विद्यार्थी क्लारा व हुगो यांनी सांगितले की, आम्ही बिझनेस स्कूलचे विद्यार्थी आहोत. भारतातील गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी व येथील संस्कृतीची माहिती घेण्यासाठी आम्ही भारतात आलो आहोत. वारी अमेझिंग असल्याने आम्ही भारावून गेलो आहोत. वारीबद्दल आम्ही आता अधिक जाणून घेणार आहोत. आज भारतातील एका मोठ्या संस्कृतीची आम्हाला जवळून ओळख झाली. आम्ही भाग्यवान आहोत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com