बारामतीत सर्वांनी पालखी सोहळ्यादरम्यान मास्क वापरण्याचे आवाहन - डॉ. मनोज खोमणे

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यात 27 जून रोजी तर बारामती शहरात 28 जून रोजी आगमन होणार
Ashadi Wari 2022 Sant Tukaram maharaj Palkhi use mask during wari is mandatory manoj Khomane baramati
Ashadi Wari 2022 Sant Tukaram maharaj Palkhi use mask during wari is mandatory manoj Khomane baramatisakal

बारामती - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यात 27 जून रोजी तर बारामती शहरात 28 जून रोजी आगमन होणार आहे. यंदा पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क अनिवार्य पध्दतीने वापरावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर पालखीसोहळा उत्साहाने होत असल्याने वारक-यांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा कोविडच्या रुग्णांची संख्या वाढू नये या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलण्यास प्रारंभ केला असून पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या प्रत्येकाने मास्क व्यवस्थित लावूनच सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान काही दवाखान्यांतून थंडी तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनीही अशा रुग्णांवर केवळ औषधोपचार न करता त्यांची कोविडची तपासणीही करावी असेही निर्देश दिल्याचे डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. बारामतीती सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय व रुई ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी सुरु आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर रॅपिड अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा तसेच ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे अशांनी तिसरा बूस्टर डोस घ्यावा, विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून सर्वांनी या कामी सहकार्य करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

भाविकांनी काळजी घ्यायला हवी...

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या काही जणांना थंडी, ताप, खोकला असे प्रकार सुरु झाले आहेत. सर्वांनीच मास्क वापरण्यासह कोविडची काळजी घ्यायला हवी, लक्षणे दिसत असतील तर तातडीने तपासणी करुन घ्यावी.- डॉ. सचिन घोरपडे, लाईफ लाईन हॉस्पिटल, बारामती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com