नागठाणे गिर्यारोहक आशिष गौरव
गिर्यारोहक आशिष मानेला गोदावरी गौरव पुरस्कार
नाशिकमध्ये वितरण; कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे झाला सन्मान
शेंद्रे, ता. १६ : साताऱ्याचा आघाडीचा गिर्यारोहक आशिष माने याला नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर- आडके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या वेळी सयाजी शिंदे, प्रशांत दामले, चंद्रमोहन कुलकर्णी, उस्मान खान, डॉ. अनिरुद्ध पंडित या विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
आपल्या या यशात आईवडिलांसह गिरीप्रेमी संस्थेच्या उषा पागे, आनंद पाळंदे, उमेश झिरपे यांच्यासह सर्व मार्गदर्शक गुरुजनांचा मोलाचा वाटा असल्याचे आशिषने नमूद केले. डॉ. संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, शिरीष चिटणीस यांच्यासह विविध मान्यवरांनी आशिषचे अभिनंदन केले आहे.
चौकट
विविध मोहिमांत यश
आशिषने एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरासह पाच शिखरे सर केली आहेत. गिरीप्रेमी संस्थेच्या हिमालयातील अतिउंच शिखरांच्या अनेक मोहिमा त्याने यशस्वी केल्या आहेत. त्यापैकी मकालू हे शिखर सर करणारा तो देशातील पहिला गिर्यारोहक आहे. ल्होत्से शिखर सर करणारा राज्यातील पहिला अन् देशातील दुसरा गिर्यारोहक आहे. शासनाने त्याला शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले आहे.
छायाचित्र ओळी
08299
नाशिक : पुरस्कार विजेते प्रशांत दामले, वसंत डहाके, सयाजी शिंदे यांच्यासह आशिष माने.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

