

Asthapur Haveli leopard attack injures a woman
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : आष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील खोलशेत वस्ती मध्ये मंगळवारी ता. ०९ रोजी पहाटे ०५:१५ वाजता बिबट्याने अंजना वाल्मीक कोतवाल वय अंदाजे ५५ यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.सदर महिला आज सकाळी आष्टापूरातील खोलशेत वस्ती येथून खानापूर येथे दशक्रिया विधीला जाण्यासाठी,आपल्या राहत्या घरापासून सुरेश आनंदा कोतवाल यांच्या घराकडे निघाल्या होत्या, या दरम्यान रस्त्यामध्ये बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.त्या हल्ल्यामध्ये त्या जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यावर कपाळावर व पायावर बिबट्याच्या दातांनी जखमा केलेल्या आहेत.त्यांना वाघोली येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.