पुणे : आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील विविध ठिकाणांहून भाविकांनी पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यातच सुरू असलेल्या द्वारयात्रेचा आनंदही भाविकांनी घेतला..ओझरला ‘श्रीं’चा जन्मोत्सव सोहळाओझर : श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २७) दुपारी साडेबारा वाजता फुलांचा वर्षाव करून मोरया गोसावींच्या पदांचे गायन करत विघ्नहर गणपतीचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्त मंदिरात सजावट केली होती. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, विश्वस्त विनायक मांडे, संतोष कवडे, शिल्पा जगदाळे आणि ग्रामस्थांच्या हस्ते पहाटे साडेचार वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.गणेशभक्त तुषार कवडे, अनिकेत बोडके, दीपक गवळी, विलास कवडे, अमोल ढवळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सकाळी नऊ ते बारा या वेळेत अंबेराई ओझर (जगदाळे मळा) येथे पृथ्वी-सूर्य पूजा करून चौथा उत्तरद्वार झाला.या पालखी सोहळ्यात श्रीराम आणि श्री विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले. पालखी मंदिरात परतल्यानंतर देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी, विघ्नराजेंद्र जोशी, जयेश जोशी, अमेय मुंगळे त्यांनी मोरया गोसावी पदांचे गायन केले. पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी देवजन्माचे कीर्तन केले..मयूरेश्वराला चिंचवड देवस्थानची मानाची पूजामोरगाव : मयूरेश्वर मंदिरात आज गणेश जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाद्रपद यात्रेचा आज चौथा दिवस आहे. चतुर्थीनिमित्त मानाची महापूजा चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते आज पार पडली.येथे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या काळात पारंपरिक यात्रा उत्सव सुरू आहे. येथे सध्या मुक्तद्वार दर्शनासाठी राज्यभरातून गणेश भक्त हजेरी लावत आहेत. पहाटे चार वाजल्यापासून मंदिराच्यासमोर भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. अधून मधून पावसाच्या रिमझिम सरी आल्या तरीही भाविकांच्या गर्दीवर आणि उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. रिमझिम पावसातही भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. मोरगाव येथे चिंचवड येथील महान साधू मोरया गोसावी यांचा पालखी सोहळा मंगळवारी रात्री मुक्कामी आगमन झाले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आतषबाजी, शोभेचे दारूकाम याची आरास पाहायला मिळाली. सर्वत्र रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. पालखीने गावात प्रवेश करताच उपसरपंच केदार वाघ यांनी स्वागत केले. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप उपस्थित होते. आज चतुर्थीनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोफत खिचडीचा प्रसाद वाटप सुरू होता. विशेष दर्शन व्यवस्था बंद ठेवून गावकऱ्यांना संधीयेथील यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. या काळात ग्रामस्थांना आणि धार्मिक द्वारयात्रा करणाऱ्या गावकऱ्यांना कमी वेळात दर्शन मिळावे यासाठी चिंचवड देवस्थाने स्वतंत्र दर्शन रांगेची विशेष व्यवस्था केली होती. गैरसोय होऊ नये म्हणून या कालावधीत विशेष दर्शन पास व्यवस्था बंद ठेवण्यात आली..गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळीजुन्नर : लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी (ता. २७) ‘श्रीं’चा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. दिवसभरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, विश्वस्त जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक, महापूजा करण्यात आली. ‘गिरीजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस आणि मंदिर परीसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. सकाळी मंदिरात नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. माणिकडोह येथील लक्ष्मण जाधव यांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिरात सकाळी ६, दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. यावेळी गोविंद मेहेर, शंकर ताम्हाणे, भगवान हांडे, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, रोहिदास बिडवई, नीलेश सरजिने उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.