चिंतेत पडलेल्या अश्विनी कदमांनी केला अजितदादांना फोन...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

कोरोनाच्या हल्ल्यानंतर उपचारात बेजार झालेले पती आणि लेकीच्या ओढीने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली.

पुणे : कोरोनाच्या हल्ल्यानंतर उपचारात बेजार झालेले पती आणि लेकीच्या ओढीने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. 'दादा, गेली चार दिवस 'त्यांचा (पती-नितीन) ताप कमी होत नाही. नेमके काय उपचार सुरू आहेत, हे बघा, अशी विनंती अश्विनी कदम यांनी केली. तेव्हा घारबलेल्या अश्विनी कदमांना धीर देत, दादा म्हणाले, "अश्विनी, तुमचे काम चांगले आहे. त्यामुळे नितीन आणि तुमची मुल बरी होतील.' पवारांपाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांनीही अश्विनी कदमांना आधार दिला.

अखेर लडाखमधील सैन्य मागे; 'तो' वादग्रस्त भाग नवा बफर झोन म्हणून घोषित!​

अश्विनी कदम यांचे पती नितीन, मुलगा विरेन आणि मुलगी गौरवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अश्विनी कदम यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर विरेनला लक्षणे नसल्याने तो घरीच आयसोलेशन आहे. तर नितीन आणि गौरवी यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशा हॉस्पिटलमध्ये दाखल करूनही सलग तीन-चार दिवस नितीन यांचा ताप आणि खोकला कमी न झाल्याने अश्विनी कदम घारबल्या

तरुणांनो, 'या' १० क्षेत्रांत लाॅकडाऊनमध्येही मिळतेय नोकरीची संधी!​

आधी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली, महापालिकेच्या विप अधिकाऱ्यांना नितीन यांच्या उपचार व्यवस्थेकडे लक्ष देण्यास सांगितले तरी, नितीन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शेवटी अजितदादांना फोन करीत अश्विनी कदम यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलून नेमकी माहिती घेण्याची विनवणी केली. भावूक झालेल्या अश्विनी कदमांच्या भावना समजून घेत अजितदादांनी त्यांना दिलासा दिला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाईन, कारण...​

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करण्याच्या मोहिमेत नगरसेविका अश्विनी आणि नितीन हे आघाडीवर होते. त्यादरम्यान नितीन यांना कोरोनाबाधित झाल्याचा संशय आहे. त्यानंतर त्रास होऊ गेल्या दहा दिवसांपूर्वी नितीन आणि गौरवी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. नितीन यांच्या प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwini Kadam called Ajit Pawar