#PlasticBan प्लास्टिक पिशवी मागितल्याने ग्राहकाला मारहाण

संदीप घिसे 
शनिवार, 30 जून 2018

पिंपरी, (पुणे) : साहित्य खरेदी केल्यानंतर ग्राहकाने प्लास्टिक पिशवी मागितल्याच्या कारणावरून दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी ग्राहकाला लोखंडी रॉडनी मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे शुक्रवारी सकाळी घडली.

मॅनवेल झेवियर दास (वय 34, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) असे जखमी झालेल्या ग्राहकाचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नसुरूउदीन अलीहसन अन्सारी व इतर तिघेजण (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अन्सारी यांची उद्यमनगर, पिंपरी येथे ऑव्हन फ्रेश बेकरी आहे. शुक्रवारी सकाळी मॅनवेल हे खारी आणि टोस्ट खरेदी करण्यासाठी बेकरीमध्ये आले होते. साहित्य खरेदी केल्यावर मॅनवेल यांनी साहित्य नेण्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी मागितली. या कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना सुरवातीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉडनी मारहाण करून जखमी केले. पोलिस हवालदार ठोंगिरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: asking for plastic bag shopkeeper beats customer