esakal | पुण्यातील रस्त्यांचे डांबरीकरण काम झाले ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Road Work

पुण्यातील रस्त्यांचे डांबरीकरण काम झाले ठप्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - एकीकडे पावसाळा (Rain) तोंडावर आलेला आहे. दुसरीकडे महापालिकेला डांबर पुरवठा (Asphalt Suply) करणाऱ्या कोकण किनारपट्टीवरील कंपन्यांचे त्योक्ते वादळामुळे मोठे नुकसान (Loss) झाले आहे. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून डांबर पुरवठाच होऊ शकला नसल्याने पथ विभागाची डांबरीकरण आणि खड्डे बुजविण्याचे काम ठप्प (Work Stop) झाले आहे. (Asphalting of Roads in Pune Stalled)

पावसाळ्यापूर्वी पथ विभागाकडून शहरातील काही प्रमुख रस्ते जेसीबीने खरडून काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम दरवर्षी केले जाते. क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे बुजविणे अशी कामे पावसाळ्यापूर्वी होतात. पण ही कामे ठप्प झाली आहेत.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासा! शहरात रुग्णसंख्या हजारच्या आतच

चक्रीवादळाचा परिणाम

 • पुणे महापालिकेला कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरातील डांबर निर्मिती प्रकल्पातून डांबर पुरवठा होतो

 • कोकण किनारपट्‍टीवर १६-१७ मे रोजी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे या प्रकल्पांचे मोठे नुकसान

 • पुणे महापालिका पथ विभागाला गेल्या १० दिवसांपासून डांबर पुरवठा झालेला नाही.

 • येरवडा येथील हॉटमिक्स प्लांटमधीलही काम ठप्प त्यामुळे रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे बुजविणे ही कामे झाली नाहीत

काम संथ गतीने

 • पथ विभागाने १५० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदाईची परवानगी दिली

 • बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आदी रस्ते बंद असल्याने जुन्या सांडपाणी वाहिन्या बदलण्याचे मोठे सुरू केले

 • समान पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांचे काम देखील सुरू

 • लॉकडाउनमध्ये सुमारे ६० किलोमीटर लांबीचे काम केले आहे

 • ही सर्व कामे ३१ मेपूर्वी संपणे अपेक्षीत आहे

 • अद्यापही अनेक ठिकाणी काम ५० ते ६० टक्के झाले आहे

 • काही ठिकाणी नव्याने सांडपाणी व जलवाहिन्यांची कामे सुरू

हेही वाचा: पुणे: हजारभर इग्वाना, दोनशेभर कासव आणि फायटर माशांची तस्करी; दोघांना अटक

या कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांवर संबंधित ठेकेदारांकडूनच काँक्रिटने पूर्ववत केली जाणार आहेत. यासाठी ३१ मेपर्यंत मुदत आहे. ही कामे तोपर्यंत पूर्ण न केल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल.

- कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

येरवडा येथील हॉटमिक्स प्लांटचे काम बंद आहे. दोन दिवसांत डांबर उपलब्ध झाल्यानंतर शहरातील पथ विभागाचे काम सुरू होईल. येरवड्यातील प्लांटमध्ये रोज ३ हजार ५०० टन डांबर हॉटमिक्स होऊन त्याचा वापर केला जातो.

- व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख