

Aspiring teachers protesting against recruitment decisions following the TET exam irregularities.
sakal
पुणे: शिक्षक आणि पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयास भावी शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेतील गोंधळ, आदी कारणांमुळे त्यांनी विरोध दर्शविला आहे.