पुण्यात चाललंय काय? ट्रीपल सीट गाडी अडवली म्हणून पोलिसालाच केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

ही घटना बुधवारी (ता.२०) रात्री साडे आठ वाजता महमंदवाडीतील सय्यदनगर रेल्वेगेटजवळ घडली.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात पोलिसांशी हुज्जत घालणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे किंवा धक्काबुक्की करण्याच्या घटना घडत आहेत. विशेषत: महिला पोलिस अधिकाऱ्यांसोबत अशा घटना घडल्या आहेत.

वाहतूक पोलिसांवर अरेरावी करण्याच्या घटना यापूर्वीही पुण्यात घडल्याचे समोर आले होते. स्वत:ची चूक असताना कारवाई केली म्हणून पोलिसांना उद्धट बोलणे, वेडीवाकडी दुचाकी चालविली म्हणून काहीजणांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केला, एकाने मास्क घातले नाही म्हणून त्याची गाडी अडवली तर त्याने पोलिसांशी हुज्जत घातली, आणखी एका प्रकरणात पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकारही घडले.  

‘कोव्हिशिल्ड’ ट्रेडमार्कचा निकाल ३० जानेवारीला; ‘सीरम’ आणि ‘क्‍युटीस बायोटीक’मधील दावा

आता दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तिघांना अडविल्याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघांसह चौघांनी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकासह तिघांना मारहाण केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी चौघांना अटक केली. ही घटना बुधवारी (ता.२०) रात्री साडे आठ वाजता महमंदवाडीतील सय्यदनगर रेल्वेगेटजवळ घडली. 

Breaking: शिवजयंतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली महत्वाची घोषणा​

मोसीन बागवान (वय 24), पैजल वहाब अन्सारी (वय 25) , शकील अद्दल अन्सारी (वय 24) , शहाबाद दिलशाद अलवी (वय 24 सर्व रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी राठोड त्यांच्या अन्य सहकाऱ्यांसमवेत सय्यदनगर रेल्वे परिसरात वाहतूक नियमन करीत होते.

पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगावात परिसरात चार वाहनांचा विचित्र अपघात​

त्यावेळी दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या मोसीनची दुचाकी राठोड यांनी अडविली. त्याचा राग आल्यामुळे त्याने राठोड यांच्याशी हुज्जत घालत, शिवीगाळ करीत आरडाओरडा सुरू केला. त्या तिघांसह तेथे आलेल्या त्यांच्या एका मित्राने राठोड यांना हाताने मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मंगेश रोकडे आणि सयाजी सुर्यवंशी यांनाही चौघांनी मारहाण केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant traffic police inspector beaten four arrested in Pune