esakal | Breaking: शिवजयंतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली महत्वाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar_Shivjayanti

व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव तसेच शिवनेरी गडाच्या सुशोभिकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

Breaking: शिवजयंतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली महत्वाची घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

जरा विचार करा! धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांचा प्रश्न, भाजपला अप्रत्यक्ष टोला​

व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव तसेच शिवनेरी गडाच्या सुशोभिकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. खा‌सदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण या वेळी उपस्थित होते. 

खासगी वाहनातून फिरणाऱ्यांना मास्कपासून मुक्ती; मुंबईनंतर पुणे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या कालावधीत सर्व धर्मांचे सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती आपण उत्साहात, सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरी करावी. सरकारच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर अभिवादनासाठी येणार आहेत. शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार करावीत. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘कोव्हिशिल्ड’ ट्रेडमार्कचा निकाल ३० जानेवारीला; ‘सीरम’ आणि ‘क्‍युटीस बायोटीक’मधील दावा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image