शुक्रावर आढळल्या जीवसृष्टीच्या पाऊलखुणा; शास्त्रज्ञांना सापडले जैविक संयुग!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

शुक्र ग्रहाच्या वातावरणात आढळलेले फॉस्फिनचे प्रमाण तुलनेने खूप जास्त आहे. पृथ्वीवर, फॉस्फिनची निर्मिती विजेच्या आणि ज्वालामुखीच्या क्रियासारख्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे होऊ शकते.

पुणे : शुक्र ग्रहावर फोस्फिन (phosphine) नावाचे संयुग सापडले आहे. पृथ्वी वगळता दुसऱ्या ग्रहावर असे जैविक संयुग सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. जैविक अभिक्रियेतून अशा संयुगांची निर्मिती होते. मात्र, शुक्रावर जीवसृष्टी असल्याचा दावा शास्रज्ञ करत नाहीत. कदाचित पुढील संशोधनाने त्यावर प्रकाश पडेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- काय आहे फोस्पिन?
फोस्फिन हे एक फोस्परस आणि तीन हायड्रोजन अणुपासून बनलेले संयुग आहे. (PH3) 

- संशोधन महत्वाचे का?
शुक्र ग्रहाच्या वातावरणात आढळलेले फॉस्फिनचे प्रमाण तुलनेने खूप जास्त आहे. पृथ्वीवर, फॉस्फिनची निर्मिती विजेच्या आणि ज्वालामुखीच्या क्रियासारख्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे होऊ शकते. परंतु केवळ थोड्या प्रमाणात पृथ्वीवर फॉस्फिनच्या निर्मितीचे स्रोत आहे.

फोस्फिनच्या रुपात दुसऱ्या ग्रहावर पहिल्यांदा जैविक संयुग आढळले आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जीवनाच्या संभाव्य चिन्हाचा हा पहिला शोध आहे. परंतु जीवसृष्टीचा दावा करण्यासाठी आपल्याकडे कोणताच ठोस पुरावा नाही.

 मराठा क्रांती मोर्चाने विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारकडे केल्या 'या' मागण्या; वाचा सविस्तर​

- कसा लागला शोध?
चिली (ALMA) आणि हवाई येथील दुर्बिणीच्या साहाय्याने शुक्र ग्रहावरून उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचे विश्लेषण करण्यात आले.

फोस्फिन संयुगातील हाड्रोजन आणि फोस्परस ज्या वारंवारीतेला एकमेकांभोवती हलतात, तेवढ्याच वारंवारीतेच्या लहरी या दोन दुर्बिणीने टिपल्या. पुढील वैज्ञानिक संशोधनाने शास्रज्ञांना या संयुगाची खात्री झाली.

जैविक अभिक्रियेच्या मिळालेल्या या पाऊलखुणा निश्चितच माणसासाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रत्यक्ष शुक्राच्या वातावरणात यान पाठवल्यानंतरच पुढची स्पष्टता येईल.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर भेट द्या- 

https://ras.ac.uk/news-and-press/news/venus-phosphine-detection-factsheet

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: astronomers announced detection of phosphine in atmosphere of Venus

Tags
टॉपिकस
Topic Tags: