Black Holes
Black Holessakal

Pune News : ‘ॲस्ट्रोसॅट’ने घडविले कृष्णविवराचे विश्वरूपदर्शन

जगभरातल्या मोठमोठ्या अवकाशीय वेधशाळांना जे जमलं नाही ते भारताच्या ‘ॲस्ट्रोसॅट’ने करून दाखविले आहे.

पुणे - जगभरातल्या मोठमोठ्या अवकाशीय वेधशाळांना जे जमलं नाही ते भारताच्या ‘ॲस्ट्रोसॅट’ने करून दाखविले आहे. एकावेळी सर्वच तरंगलांबीतून कृष्णविवराची प्रतिमा टिपण्याची कामगिरी ‘ॲस्ट्रोसॅट’ने केली असून, जगातील ही पहिलीच घटना आहे. एकप्रकारे बहुअंगाने कृष्णविवराचे होणारे विश्लेषण नवे रहस्य उलगडण्यास मदत करणार आहे.

एखाद्या ताऱ्याला गिळंकृत करताना कृष्णविवराभोवती पदार्थांची एक चकती तयार होते. यामधून क्ष- किरणांबरोबरच अतिनील आणि दृष्य प्रकाश बाहेर पडतो. आजवर विविध अवकाशीय वेधशाळांतून यापैकी फक्त एकाच प्रकाशाचे निरीक्षण करत प्रतिमा मिळविण्यात आली होती. प्रथमच ॲस्ट्रोसॅटवर असलेल्या विविध उपकरणांनी सर्वच तरंगलांबीतून प्रतिमा प्राप्त केली आहे.

ज्यामुळे कृष्णविवरा भोवतीच्या चकतीच्या बाहेरील भागातील प्रकाशीय उत्सर्जन आतील भागातील क्ष-किरणांच्या उत्सर्जनावर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘द ॲस्ट्रोफिजीकल जर्नल’ या आंतररराष्ट्रीय शोधपत्रिकेत नुकताच यासंबंधीचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राबरोबरच (आयुका) देशभरातील विविध संस्थांचा संशोधनात सहभाग आहे. तसेच ब्रिटन, अबुधाबी आणि पोलंडच्या शास्त्रज्ञांचेही यात योगदान आहे.

ॲस्ट्रोसॅटवरील सहभागी उपकरणे

सॉफ्ट एक्स-रे टेलिस्कोपने (एसएक्सटी) कृष्णविवराभोवतीच्या चकतीच्या आतील (ऍक्रिशन डिस्क) भागाचे निरीक्षण टिपले, तर लार्ज एरिया एक्स-रे प्रोपोर्शनल काउंटर (एलएएक्सपीसी) आणि कॅडमियम झिंक टेलुराइड इमेजर (सीझेडटीआय) उपकरणांनी उच्च दर्जाचे क्ष-किरण प्रतिमा प्राप्त केली.

प्रथमच ॲस्ट्रोसॅटवरील सर्व उपकरणांचा यशस्वीपणे वापर करत कृष्णविवराची प्रतिमा टिपता आली आहे. इतर वेधशाळांनी कृष्णविवरासंबंधी घेतलेली निरीक्षण पडताळता येतील आणि यातून नवे विज्ञान समोर येईल. कृष्णविवरा जवळचे आणि दूरवरचे पदार्थांचे वर्तन यामुळे अभ्यासले जाईल.

- दिपांकर भट्टाचार्य, अध्यक्ष, ॲस्ट्रोसॅट सायन्स वर्किंग ग्रुप

संशोधनाचे वैशिष्ट्ये?

  • कृष्णविवराची वेगवेगळ्या तरंगलांबीत टिपलेल्या प्रतिमा फार दुर्मिळ. ॲस्ट्रोसॅटमुळे अशा प्रतिमा मिळतील.

  • एखाद्या महाकाय ताऱ्याला गिळंकृत करत असताना कृष्णविवराभोवतीची भौतिक बदल अभ्यासता येतील. एकाच वेळी रेडिओ, क्ष-किरण, अतिनील आणि प्रकाशाच्या तरंगलांबीतील बदलांचा अभ्यास होईल.

  • कृष्णविवराचे वस्तुमान, त्याचा वाढत जाणारा आकार आणि विश्वातील त्याची भूमिका अधिक स्पष्ट करण्यास मदत होईल.

द्वैती कृष्णविवराचे नाव - MAXI J1820+070

पृथ्वीपासूनचे अंतर - ९८०० प्रकाशवर्षे

या कृष्णविवरावरील पहिला स्फोट कोणी टिपला - आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरी मॅक्सी उपकरण (२०१८)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com