रस्त्याचे डांबरीकरण नाही तर किमान खड्डे तरी बुजवा | Road Issue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road
रस्त्याचे डांबरीकरण नाही तर किमान खड्डे तरी बुजवा

रस्त्याचे डांबरीकरण नाही तर किमान खड्डे तरी बुजवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री - एनआयबीएम रोड, भिंताडेनगर, हांडेवाडी रोड, महंमदवाडी-सय्यदनगर रस्त्यावरील अतिक्रमणे आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा होऊन निर्माण होत आहे. रस्ता कमी, खड्डे जास्त अशी रस्त्याची स्थिती असल्याने वाहनचालक कमालीचे त्रासले आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्याचे डांबरीकरण नाही, तर किमान खड्डे तर नीटनेटके बुजवावेत, अशी आर्जवी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, ओंकार होले, शशिकांत पुणेकर, उत्तम फुलावरे, राजेंद्र भिंताडे, श्रीकांत भिंताडे, अक्षय टकले, दादासाहेब कड, विक्रम आल्हाट, धनंजय हांडे, म्हणाले की, महंमदवाडी परिसरामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे.

हेही वाचा: नगररोड वरील बीआरटी बस थांबे अस्वच्छतेच्या विळख्यात

जय भवानी चौकामध्ये महापालिकेचा भानगिरे दवाखाना असून, उपचारासाठी परिसरातील नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. त्याचबरोबर जय भवानी चौकातून उंड्री चौक आणि हांडेवाडी चौक कात्रज-मंतरवाडी बायबास रस्त्याकडे वाहनांची सतत वर्दळ असते. खड्डेमय रस्ते आणि गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने असल्याने दुचाकीला अपघाताचा धोका वाढल्याचे त्यांनी सांगितले.

रिबेका कांबळे म्हणाल्या की, महंमदवाडीतील जय भवानी (न्याती चौक) चौकामधून पीएमपी बस वळण घेताना वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूककोंडी होत असल्याने होत आहे. पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असा सल्लाही त्यांनी सूचविला आहे.

loading image
go to top