esakal | बारामतीतील रस्त्यांची किमान डागडुजी तरी करा...
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील रस्त्यांची किमान डागडुजी तरी करा...

बारामतीतील रस्त्यांची किमान डागडुजी तरी करा...

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाने खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यांची कामे होतील तेव्हा होतील किमान या खड्डयांची डागडुजी तरी प्रशासनाने करावी अशी बारामतीकरांची मागणी आहे.

शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांसह गावठाणातील रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. या बाबत चौकशी केल्यानंतर पावसाळा झाल्यावर कामे करणार असल्याचे सांगितले गेले, काही ठिकाणी गॅस पाईपलाईन तर पावसाळी गटार योजनेची कामे सुरु आहेत, काही ठिकाणी महावितरणची कामे केली जाणार असल्याचेही सांगितले गेले.

रस्त्यांचे काम करायचे तेव्हा करा पण किमान डागडुजी करुन मोठे खड्डे तरी बुजवून लोकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी अशास्त्रीय पध्दतीने व मनमानी पध्दतीने केलेले गतीरोधकही काढून टाकावेत अशीही मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे.

वारंवार वृत्तपत्रात बातम्या प्रसिध्द होतात मात्र या बाबत प्रशासन ढिम्म असते. बातमी प्रसिध्द झाल्यानंतर किमान त्यावर काही कार्यवाही झाली की नाही किंवा त्या बाबत नगरपालिकेची भूमिका काय आहे याचा खुलासा करण्याचेही सौजन्य दाखविले जात नाही.

हेही वाचा: सकाळ'ने राबवलेला उपक्रम हा अत्यंत कौतुकास्पद - जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन

अनेक रस्त्यांवरुन दुचाकी चालविणे जिकीरीचे होऊन बसले आहे. पाऊस पडल्यानंतर खड्डयात पाणी साचते, या खड्डयांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरुन पडतात. अनेक ठिकाणी कंत्राटदारांक़डून कामे केल्यानंतर त्या ठिकाणचे डांबरीकरण होण्यास काही महिन्यांचा कालावधी लोटतो, मात्र काम केलेल्या ठिकाणी पडलेले खड्डे किंवा चा-या बुजविण्याचे सौजन्य दाखविले जात नाही आणि त्यांनी तसे करावे या साठी नगरपालिका प्रशासनही काहीही करत नाही अशी स्थिती आहे. गेल्या 80 दिवसांपासून बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारीच नाही, त्या मुळे तक्रारी कोणाकडे करायच्या असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.

सामान्यांना वाली नाही

कोणत्या रस्त्याचे काम मंजूर झाले, कोणते काम किती रुपयांचे आहे, ते कोण करणार आहे, त्याचा कालावधी किती आहे, ते कशा प्रकारचे आहे याची माहिती अनेकदा नगरसेवकांनाही नसते, लोकांना माहिती होण्याचा प्रश्नच येत नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही अनेकदा माहितीच दिली जात नाही. नगरपालिका प्रशासनाने सामान्यांच्या माहितीसाठी या बाबत सविस्तर माहिती देण्याची गरज आहे.

loading image
go to top