वाजपेयी अन्‌ कारगिल रणभूमी

Kargil
Kargil

पुणे - कारगिल युद्ध हे सर्वांत अवघड आणि थरारक होते. या युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रत्यक्ष कारगिलच्या युद्धभूमीत येऊन जवानांशी संवाद साधला होता. त्यांनी शत्रूच्या पकडलेल्या जवानांचीही आपल्या अधिकाऱ्यांसोबत चौकशीही केली होती. त्या आठवणी आजही अंगावर रोमांच उभे करतात, अशा शब्दांत खडकीच्या अपंग पुनर्वसन केंद्रातील जवानांनी वाजपेयी यांच्या स्मृती जागवल्या.

वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवाजीनगरचे आमदार विजय काळे, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर, ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी युद्धभूमीवर लढताना कायमचे जायबंदी झालेल्या जवानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी या केंद्राचे वैद्यकीय संचालक कर्नल आर. के. मुखर्जी उपस्थित होते. 

यावेळी कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले सेना मेडल विजेते मिलिटरी इंटेलिजन्सचे नाईक रमेश पुरी म्हणाले, ‘‘कारगिल सेक्‍टरमध्ये युद्धाचे ढग जमू लागले तेव्हा आपण पुण्यात कुटुंबासमवेत होतो. एक दिवस अचानक मला कारगिलला निघण्याचा संदेश आला आणि तातडीने कारगिलकडे गेलो. मला द्रास सेक्‍टरमध्ये पाठवण्यात आले. भारतीय सैन्य हे जमिनीवर आणि शत्रूचे सैनिक पहाडावर. तेथून ते डावपेच आखत होते. तशातही आम्ही शत्रूच्या बातम्या काढायला सुरवात केली.’’

आश्‍चर्याचा दिला धक्का
युद्ध सुरू असताना एक दिवस अचानक वाजपेयी यांनी स्वतः युद्धभूमीवर येऊन सैनिकांना आश्‍चर्याचा धक्का दिला. त्यांच्या आगमनाने सैनिकांचा उत्साह वाढला. युद्धभूमीवर गोळीबार सुरू असल्याने वाजपेयी यांना मागेच आमच्या तळावर थांबवण्यात आले होते. तिथे आपल्या सैन्याने पकडलेले काही शत्रूचे सैनिक होते आणि अधिकारी त्यांची चौकशी करत होते. पंतप्रधान वाजपेयी तेथे चौकशीच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी स्वतः शत्रूच्या सैनिकांची चौकशी केली. त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी त्यांना प्रश्न विचारले, अशी आठवण पुरी यांनी सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com