बारामतीत रस्त्यावर एटीएम कार्ड सापडले...त्या कार्डवर पिनही लिहिलेला होता, पण...

मिलिंद संगई
Wednesday, 16 December 2020

एटीएम कार्डवर पिन नंबर आहे हे पाहिल्यावर केदार पाटोळे व मित्रांनी तडक शहर पोलिस ठाणे गाठले व पोलिसांकडे हे कार्ड सुपूर्द केले. न

बारामती : रस्त्यावर एक एटीएम कार्ड सापडते...त्या कार्डवर त्या एटीएमचा पिनही लिहिलेला असतो...एखाद्याला शक्य झाले असते तर खात्यातून सहजतेने पैसे काढून घेता आले असते. पण माणूसकी अजूनही जिवंत आहे याचे उदाहरण बारामतीत पाहायला मिळाले.

हे ही वाचा : गुलाबी थंडीतही व्यायामासाठी सायकलिंगला ग्रामीण भागातही पसंती

येथील स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत बायडाबाई रमेश खरात यांना पंचायत समितीनजिक स्वच्छता करताना कॉसमॉस बँकेचे एटीएम कार्ड सापडले. त्यांनी ते कार्ड आपला मुलगा बाबू खरात याला दिले, बाबू यालाही त्यातील फारशी माहिती नसल्याने त्याचा मित्र असलेल्या रिक्षाचालक केदार देवानंद पाटोळे यांच्याकडे त्याने ते कार्ड सोपविले. त्या वेळेस केदारसोबतच रोहित भोसले, कुणाल कसबे हे त्याचे मित्रही होते. 

हे ही वाचा : पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

एटीएम कार्डवर पिन नंबर आहे हे पाहिल्यावर केदार पाटोळे व मित्रांनी तडक शहर पोलिस ठाणे गाठले व पोलिसांकडे हे कार्ड सुपूर्द केले. नशीबाने त्याच्यावर मोबाईल नंबरही असल्याने पोलिसांनी संबंधितांना ते कार्ड घेऊन जाण्यास सांगितले. 

सदरचे कार्ड बारामतीतील व्यापारी गुलाबराव ढेंबरे यांच्या मुलीचे होते. या खात्यात पैसेही होते, त्या मुळे सहजतेने पैसेही काढता आले असते, मात्र केदार व त्याच्या मित्रांनी पोलिसात कार्ड जमा करुन माणूसकीचे दर्शन घडविले. ढेंबरे यांनी केदार, रोहित, बाबू व कुणाल या चौघांना या कामाची शाबासकी म्हणून थंडीचे जर्किन देऊ केले. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनीही या युवकांचे कौतुक केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM card found on the road in Baramati