'आदर्श शिक्षणाच्या वाटेवर चालणे ही तपस्या'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे  - एका आदर्श शिक्षणाच्या वाटेवर इतरांना घेऊन चालणं ही एक मोठी तपस्या असते. या पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षणाला केंद्रस्थानी मानून नवीन वाटेने काम करणाऱ्या आणि समाजातील वंचित घटकाला स्वावलंबी बनविणाऱ्या लोकांमुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी केले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

"दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी, पुणे'तर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. गुरुवर्य आबासाहेब अत्रे आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. राजाराम दांडेकर आणि रेणू दांडेकर यांना; तर श्रीमती इंदिरा आबासाहेब अत्रे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. अरविंद कुलकर्णी यांना डॉ. अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव सुदन्वा बोडस आदी मान्यवर उपस्थित होते. 

कुलकर्णी म्हणाले, ""जुनी फुटपट्टी घेऊन नवीन शिक्षणपद्धतीचे मोजमाप करू नये. विद्यार्थी क्‍लासला जातो कारण त्याला माहीत आहे, शिक्षक नीट शिकवत नाही आणि हे शिक्षकालाही माहीत असल्यामुळे तोही नीट शिकवत नाही. परंतु, शिक्षकाच्या प्रत्येक हालचालीकडे विद्यार्थ्यांचे बारीक लक्ष असते, त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची आहे.'' 

डॉ. दांडेकर म्हणाले, ""जगण्यासाठी आणि समाजासाठी काहीतरी उपयोगी पडेल, असे काहीतरी नवीन शिकण्यासाठी शाळा सुरू केली. रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या काजव्यांना माहिती नसते की ते किती चमकत आहेत. तसेच प्रत्येक शाळा ही काजव्यांनीच भरलेली असते. त्याला केवळ त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे.'' 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना गुजर यांनी केले. 

Web Title: Atre teacher award in pune