करुणा शर्मा यांच्या विरोधात पुण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

करुणा शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल
Karuna Sharma News
Karuna Sharma News karuna munde

पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यावर पुणे (Pune) येथील येरवडा पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणी येरवडातील महिलेने फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे, की तिचा पती व करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यावर शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. (Atrocities Case Filed Against Karuna Sharma In Pune)

Karuna Sharma News
'पंकजा मुंडेंना सापत्न वागणूक, फडणवीस अन् पाटील उपहासात्मक बोलून हिणवतात '

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. त्या आपली ओळख करुणा मुंडे असे करुन देत. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्मा यांच्या घरी राहू लागला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायिक झाले. पती हा शर्मा यांच्याशी वारंवार बोलत होता. १६ फेब्रूवारी २०२२ रोजी कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले.

Karuna Sharma News
अग्निपथ योजना देशातील तरुणांना..., प्रियंका गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

येथे करुणा शर्मा यांनी हाॅकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव हे करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com