ATS Crime : नारायणगाव भागात एटीएस ची कारवाई; आठ बांगलादेशी तरुण ताब्यात

मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) नारायणगाव, कोल्हेमळा परिसरात कारवाई करून आठ बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेतले.
ats
atssakal

नारायणगाव - मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) नारायणगाव, कोल्हेमळा परिसरात कारवाई करून आठ बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेतले असून नारायणगाव पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे.

मुंबई येथील एटीएस पथकाने आज सकाळपासूनच नारायणगाव परिसरात बांगलादेशी नागरिकांची शोध मोहीम सुरू केली. त्यांनी टाकलेल्या धाडसत्रात आठ बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सुमारे सहा वर्षांपूर्वी पाकिस्तान बरोबर कनेक्शन असल्याचा संशयावरून वारूळवाडी येथे एटीएसच्या पथकाने छापा टाकून बांधकाम व्यवसायिकाकडे कामाला असलेल्या एका बांगलादेशी तरुणाला अटक केली होती. त्यानंतर नारायणगाव परिसरात झालेली ही मोठी कारवाई आहे.

याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता एटीएस ने कारवाई करून काही बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेतले आहे. मात्र ही कारवाई अजून सुरू आहे. या बाबतची अधिकृत माहिती अद्याप मला मिळाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com