भांडण सोडवायला गेला अन् त्याच्यावरच धारदार शस्त्राने वार केला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पुणे : दहिहंडी उत्सवाच्यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरून झालेली भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर कोयत्याने व तलवारीने वार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक केली. 

पुणे : दहिहंडी उत्सवाच्यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरून झालेली भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर कोयत्याने व तलवारीने वार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक केली. 

विनायक सुनिल गायकवाड (वय 25, रा.पाषाण), किशोर लक्ष्मण रामाववत (वय 24, रा.पाषाण), संकेत राजु जाधव (वय 20, रा.औंध) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रावण जाधव यांनी चतुःश्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे त्यांच्यासह मित्रासह पाषाण येथे दहिहंडी पहाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मित्राचा संकेत जाधव यास धक्का लागल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी फिर्यादीने मध्यस्थी करीत वाद मिटविला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीस तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. दहीहंडी झाल्यानंतर फिर्यादी घरी जात असताना विनायक, किशोर, संकेत या तिघांनी त्यास हॉटेल सर्जा येथे अडविले. त्यानंतर तिघांनी त्यांच्याकडील तलवार व कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीस उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, संबंधीत आरोपी पाषाण रस्त्यावरील हॉटेल अभिमान श्री जवळ त्यांच्या नातेवाईकांची वाट पाहत थांबले असून ते पुण्यातुन पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकातील पोलिस कर्मचारी शंकर संपते व विशाल शिर्के यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून आरोपींना अटक केली. विनायक गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्यास यापुर्वी तडीपार करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, निलेशकुमार महाडिक, पोलीस कर्मचारी सुनिल पवार, सचिन ढवळे, विशाल शिर्के, शंकर संपते, गणेश काळे, शंकर पाटील, शितल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on boy by sharp weapon in dahi handi festival at pune