esakal | एकतर्फी प्रेमात झाला वेडा; मुलीच्या वडिलांवर केला जीवघेणा हल्ला, बहिणीलाही मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Attack on girls Father Sharp weapon refusing love sister beaten wanwadi

सौरभ अडागळे याचे फिर्यादीच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने फिर्यादीच्या मुलीला प्रेमाची मागणी घातली होती, मात्र मुलीने त्यास नकार दिला होता. या कारणावरुन रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सौरभ अडागळे याने फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरडाओरडा करीत फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली होती.

एकतर्फी प्रेमात झाला वेडा; मुलीच्या वडिलांवर केला जीवघेणा हल्ला, बहिणीलाही मारहाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : तरुणीने प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरुन मुलीच्या वडीलांवर टोळक्‍याने कोयत्याने वार करीत खुनाचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मुलीसह तिच्या बहिणीलाही टोळक्‍याने मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हडपसरजवळील काळेपडळ येथील नेहरु पार्क गल्लीमध्ये घडला. याप्रकरणी चौघांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 

व्यापा-यांमुळे काेराेना हाेताे का? आम्ही दुकान सुरु ठेवणारच!
 

सौरभ अडागळे, सागर अडागळे, ओम भोसले व रोहीत भोसले अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय हडपसरमधील काळेपडळ येथे राहतात. सौरभ अडागळे याचे फिर्यादीच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने फिर्यादीच्या मुलीला प्रेमाची मागणी घातली होती, मात्र मुलीने त्यास नकार दिला होता. या कारणावरुन रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सौरभ अडागळे याने फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरडाओरडा करीत फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

या प्रकाराबाबत फिर्यादी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. ते काळेपडळमधील नेहरु पार्क गल्लीमध्ये आले, त्यावेळी संबंधीत तरुण व त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादीस अडविले. त्यानंतर सौरभ अडागळे याने फिर्यादीला "माझ्या भावाला तु का मारलेस, आता तुला जिवंत सोडणार नाही', असे म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्‍क्‍या व दगडांनी मारहाण केली. केवळ तेवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या दोन्ही मुलींनाही जबर मारहाण केली. या घटनेनंतर आरोपींनी त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवून "आमच्या नादाला कोणी लागू नका, नाहीतर कोणालाही जिवंत सोडणार नाही', असे मोठमोठ्याने ओरडत परिसरामध्ये दहशत निर्माण केली. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे आरोपींनी उल्लंघन केले. 

loading image