esakal | छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला

बोलून बातमी शोधा

attack of of Chhatrapati Sugar Factory Director Anil Bagal

छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By
डॉ. प्रशांत चवरे

भिगवन : छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व पिंपळे(ता.इंदापुर) गावचे माजी सरपंच अनिल बागल यांचेवर शनिवारी(ता.०१) दुपारी प्राणघातक हल्ला झाला आहे. धारदार शस्त्राच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात बागल हे गंभीर जखमी झाले असून डोके, छाती व हाताच्या बोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असनू या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहितीनुसार, अनिल बागल यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपाचे पिंपळे गावचे हद्दीत काम सुरु आहे. बागल हे सदर कामावर पाहणी करण्यासाठी शनिवारी दुपारी तेथे गेले होते. त्या ठिकाणी अचानक येऊन हल्लेखोरांनी त्यांना घेरत त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांपासून बचाव करत असताना त्यांच्या डोक्याला, छातीला गंभीर जखमा झाल्या आहेत तर हाताची बोटेही तुटली. पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या कामगारांनी तातीडने त्यांना भिगवण येथील खासगी रुग्नालयांमध्ये आणले तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्नालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: पथारी व्यावसायिक झाले भ्रमनिरास

बागल यांचेवरील हल्ल्याबाबत माहिती मिळताच बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

हेही वाचा: सिंगापूरहून मागवलेले कॉन्संट्रेटर आणि व्हेंटिलेटर पुण्यात दाखल