पुणे - निवृत्त पोलिस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर वानवडी परिसरात हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड लागल्याने शेख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्लेखोराचे नाव तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख काही महिन्यांपूर्वी पोलिस दलातून निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. सध्या ते कोंढवा परिसरात राहायला आहेत. शुक्रवारी रात्री हल्लेखोराने त्यांच्यावर दगडाने हल्ला केला.
या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शेख यांच्यावर कोणत्या कारणातून हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.