पोलिस आयुक्त कार्यालयासमोर दोघांवर वार 

संदीप घिसे 
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) : दुचाकीवरून चाललेल्या दोन जणांवर पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी कोयत्याने वार केले. ही घटना पोलीस आयुक्त कार्यालयासमोर गुरुवारी पहाटे घडली. 

अमूल बसवराज वाल्हे (वय 20) आप्पासाहेब अतुल कदम (वय 20, दोघेही रा. पेठ क्रमांक 22, ओटास्कीम, निगडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अन्थोनी फ्रान्सीस (वय 22), रॉबीन फ्रान्सीस (वय 25, दोघेही रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जखमी अमोल वाल्हे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल आणि त्यांचा मित्र आप्पासाहेब हे दोघे गुरुवारी पहाटे आपल्या दुचाकीवरून चालले होते. ते पिंपरीतील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी घालून उभे राहण्यास भाग पाडले. त्यानंतर आपल्याजवळील कोयत्याने अमोल आणि आणि आप्पासाहेब यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. पोलिस उपनिरीक्षक शिरसाट याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: attack on two in front of Police Commissioner office at Pimpri