पुणे : दारू पिण्यास विरोध केल्याने टोळक्‍याकडून कामगारांवर कोयत्याने वार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

बांधकाम प्रकल्पावर दारू पिण्यास मज्जाव केल्यामुळे टोळक्‍याकडून कामगारांवर कोयत्याने वार 

पुणे : बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी दारू पिण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरुन टोळक्‍याने कामगारांवर कोयत्याने वार केले.तसेच वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बाणेर परिसरातील विधाते वस्ती येथे घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी राकेश खेतावत (वय.26, रा. बाणेर ) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेरमधील विधाते वस्ती येथे एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे फिर्यादी खेतावत हे त्यांच्या सहकारी कामगारांसह काम करीत होते.

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

पाच ते सहा जण तेथे दारु पिण्यासाठी आले. सर्वजण तेथे दारु पिण्यासाठी बसू लागल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांना संबंधित ठिकाणी दारु पिवू नका, असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांचे नातेवाई शंकर व कुमार खेतावर यांच्यावर लोखंडी सळई व कोयत्याने वार केले. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आरोपींनी बांधकाम प्रकल्पाच्या परिसरात लावण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.डी. पवार करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attacked on worker Due to the prohibition against drinking alcohol

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: