येरवड्यात पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे, ता. 6 : येरवडा कारागृहाचे पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील यांच्यावर आज सकाळी आठच्या सुमारास गोळीबार झाला. सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही. त्यांना कोणतीही इजा झालेली नसून ते सुखरुप आहेत. ही घटना येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. 

पोलिस उपनिरीक्षक पाटील हे रात्रपाळीचे काम संपवून सकाळी आठ वाजता येरवडा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातुन बाहेर पडत होते.  त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पाटील यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर वेगाने घटनास्थळावरुन फरार झाले.

Web Title: Attempt to kill PSI