स्क्रु ड्रायवर, कात्रीने भोसकून खुनाचा प्रयत्न

crime-logo.jpg
crime-logo.jpg

पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी एकाला स्क्रु ड्रायवर आणि कात्रीने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना भांडारकर रस्त्यावर हाॅटेल 8 समोर घडली.  याप्रकरणी दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. 

नितीन राजा पवार (वय २३, रा.  वैदुवाडी)  असे जखमीचे नाव आहे, याप्रकरणी त्याने फिर्याददिलीआहे. मयुर बहिरट,  गोविंद पवार या दोघांना अटक केली आहे. नितीन पवार आणि आरोपी पुर्वीपासून एकमेकांच्या ओळखीचे आहे. त्यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास नितीन पवार हा भांडारकर रस्त्यावरील हाॅटेल 8 येथून जात होता. त्यावेळी बहिरट आणि पवार या दोघांनी त्याला अडवून जुन्या वादातून भांडण सुरु केले. यात नितीन पवारच्या पोटात स्क्रु ड्रायव्हर आणि कात्रीने भोसकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. नितीन पवार यानेही गोविंद याच्या कानाच्या मागे कात्रीने वार केल्याने त्याच्या विरोधात ही गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांनी दिली.  

हाॅटस्पाॅटवर घडला गुन्हा
पुणे पोलिसांनी शहरात ज्या भागात वारंवार गुन्हे घडतात असे सुमारे ३०० 'हाॅटस्पाॅट' निश्चित केले आहेत. भांडारकर रस्त्यावरील 'हाॅटेल 8' चा परिसर त्यापैकी एक आहे. याच ठिकाणी हा खूनाचा प्रयत्न झाला असल्याने त्याचीही नोंद पोलिसांनी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com