पुणे - केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शासकीय ताफ्यात कार शिरण्याचा प्रयत्न केल्याची घटना संचेती चौकात रविवारी (ता. १३) घडली. बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला..या प्रकरणी कारचालक शुभम विजय वणीत (वय ३२, रा. नाना पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार ईश्वर भिकुले यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिकुले हे शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात नियुक्तीस आहेत..केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते अंगरक्षक आहेत. रविवारी (ता. १३) मोहोळ यांचा ताफा रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती चौकातून निघाला होता. संचेती चौकातून ताफा निघाल्यानंतर ताफ्यातील वाहनांनी सायरन वाजवून याबाबतची सूचना वाहनचालकांना दिली..त्या वेळी तेथून निघालेल्या कारचालक तरुणाने ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न केला. ताफ्यात कार शिरल्याने अडथळा निर्माण झाला. आदेशाचे उल्लंघन करणे, तसेच मोटार वाहन कायद्यान्वये दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.