पुण्यात हायवेच्या पुलावरून उडी मारून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राजेंद्रकृष्ण कापसे
Friday, 25 September 2020

वारजे माळवाडी येथील हायवेच्या पुलावरून तरुणाने गुरुवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी देखील असाच उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. गुरूवारी तो खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती वारजे माळवाडी पोलिसांनी माहिती दिली.

वारजे माळवाडी (पुणे) : वारजे माळवाडी येथील हायवेच्या पुलावरून तरुणाने गुरुवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी देखील असाच उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. गुरूवारी तो खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती वारजे माळवाडी पोलिसांनी माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमोल भीमा कांबळे (वय- 30 रा. लोकमान्य कॉलनी, महादेव मंदिर जवळ शास्त्रीनगर कोथरूड) असे त्या उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बिगारी काम करतो. त्याने 40-45 फुटावरून उंचावरून उडी मारली. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी ससून मध्ये दाखल केले आहे. अशी माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमृत मराठे यांनी दिली. 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

वारजे माळवाडी येथील हायवेच्या उड्डाणपुलाचा परिसर बऱ्यापैकी गर्दी असलेला असतो. या ठिकाणी ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी त्याने याच ठिकाणी उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. कर्ज, भांडण, पत्नी माहेरी गेल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

वारजे माळवाडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात त्याचा जबाब घेतला होता. त्यातील माहितीनुसार अमोल हा मजुरी काम करणारे आई वडील व दोन मुलांसह शास्त्रीनगर कोथरूड येथे राहतो. तसेच त्याच्यावर कर्ज देखील होते. कर्जामुळे आणि नवरा बायकोच्या भांडणांतून बायको माहेरी गेल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. रागराग चिडचिडपणा त्याचा वाढला होता.  

...त्या दिवशी पोलिसांनी वाचविले 
त्याने मंगळवारी (दि. 22) रोजी सायंकाळच्या वेळी महामार्ग उड्डाणपूलावरून आरडाओरडा करून खाली वाहतूक सुरू असलेल्या वाहतूकीच्या मुख्य रस्त्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वारजे वाहतूक विभाग पोलिस, दुचाकी चालक संग्राम थोरात व पोलिस कर्मचारी प्रविण जगताप यांनी मोठ्या शिताफीने त्याला झडप घालून त्याला मागे ओढले होते. तेव्हा वारजे वाहतूक विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक अमोल गवळी
वारजे माळवाडी पोलिसांनी अधिकाऱ्यांनी वारजे पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला घरी पाठवले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted suicide by jumping from a highway bridge in Pune