
स्वच्छतागृहाच्या भांड्यात अर्भक ठेऊन पसार होण्याचा प्रयत्न फसला
धायरी - सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर भागात सार्वजनिक स्वच्छतागृहात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
वडगांव बुद्रुक परिसरातील तुकाईनगर भागात एक जोडपे गेल्या चार - पाच वर्षापासून राहत आहे. संबधित महिला गर्भवती होती. मात्र गर्भवती असल्याचे शेजारील लोकांना समजू नये यासाठी ती महिला घराबाहेर पडत नव्हती. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती स्वच्छ्तागृहात गेला असता तिथे लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्याने निरखून पाहिले असता स्वच्छ्तागृहाच्या भांड्यामधे जिवंत अर्भक दिसून आले.
याबाबत पोलिसांना तातडीने कळविण्यात आल्यानंतर त्या अर्भकाला तेथून हलवून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मी प्रातःविधीसाठी गेले होते. मला काही समजले नाही असे म्हणत त्या महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही ती महिला खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे करत आहे..
'माता न तू वैराणी'
पोटचे पोर अतिशय घाणेरड्या जागी बेवारस सोडून देणारी संबंधित आई लोकांच्या तिरस्काराचा विषय ठरली. तेथे जमलेल्या काही नागरिकांनी त्या अर्भकाचे व्हिडीओ काढले. काही क्षणातच ते व्हिडिओ व्हायरल झाले असून अशा निर्दयी महिलेला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
'संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून,बाळाला ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
- शैलेश संखे-वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिंहगड पोलिस स्टेशन
Web Title: Attempts Pass Placing The Infant Toilet Bowl Failed Crime Women
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..