esakal | चतुर्थीनिमित्त लेण्याद्री येथे गणपतीला केळीची आकर्षक आरास

बोलून बातमी शोधा

lenyadri ganapati
चतुर्थीनिमित्त लेण्याद्री येथे गणपतीला केळीची आकर्षक आरास
sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अष्टविनायक श्री गिरीजात्मज गणेशास शुक्रवारी ता.३० रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त ६१ डझन केळ्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सकाळी विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या उपस्थितीत अभिषेक व पूजा करण्यात आली. फळे व भाजीपाला निर्यातदार लक्ष्मण मारुती भुजबळ यांचेकडून चतुर्थीनिमित्त गणपतीस ६१ डझन केळीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ही सर्व केळी प्रसाद रूपाने वाटण्याऐवजी लेण्याद्रीवरील माकडांना देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सचिव जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.

हेही वाचा: जुन्नर : आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी

कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर नागरिकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद आहे. मंदिर बंद असले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून भाविकांना दर्शन उपलब्ध असून त्याचा अनेक गणेश भक्त लाभ घेत आहेत. आज कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे यासठी श्री गणेशाला साकडे घालण्यात आले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त, पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.

लॉकडाउनचे निर्बंध सुरू असल्याने मंदिर बंद आहे. मंदिर बंद असल्याने भाविक नाहीत व भाविक नसल्याने येथील माकडांना खाद्यपदार्थ मिळत नाहीत यामुळे देवस्थान इच्छुक भाविकांच्या साहय्याने त्यांना खाद्यपदार्थ पुरवत आहेत अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.

हेही वाचा: नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेडसह 'या' जिल्ह्यांना धोक्याची घंटा; येत्या तीन तासात जोरदार पाऊस!