लेण्याद्रीला अंगारकी चतुर्थीनिमित्त फुलांची आकर्षक आरास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेण्याद्रीला अंगारकी चतुर्थीनिमित्त फुलांची आकर्षक आरास

लेण्याद्रीला अंगारकी चतुर्थीनिमित्त फुलांची आकर्षक आरास

पुणे (जुन्नर) : श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील अष्टविनायक गिरीजात्मज गणपती मंदिरात मंगळवार ता. २३ रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाल्यानंतर प्रथमच अंगारकी चतुर्थी आली असल्याने दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. दिवसभरात सुमारे १५ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.

हेही वाचा: झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे व जयवंत डोके यांच्या हस्ते पहाटे श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, प्रभाकर गडदे व गोळेगाव ग्रामस्थ उपस्थित होते. कराड येथील मधुकर मारुती पाटील या भाविकाने अन्नदानाकरीता दहा हजार एक रुपयांची देणगी दिली.

loading image
go to top