रांजणगावच्या महागणपतीला आकर्षक सुवर्ण अलंकार व फुलांची सजावट

रांजणगावच्या महागणपतीला आकर्षक सुवर्ण अलंकार व फुलांची सजावट

तळेगाव ढमढेरे : श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थान ट्रस्टतर्फे पहाटे महागणपतीचा अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी महापुजा व महानैवेद्य करण्यात आला. चतुर्थीनिमित्त महागणपतीला आकर्षक सुवर्णालंकार व पोशाख परिधान करण्यात आला होता.

चतुर्थीनिमित्त प्रगतशील शेतकरी  नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे मंदिर परिसरात नागरिकांसाठी विशेष व्यवस्थ करण्यात आली असून, लॉकडाऊननंतरची ही पहिलीच संकष्ट चतुर्थी असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चतुर्थीनिमित्त येथील साईदीप मोल्डिंग इंडस्ट्रीज कंपनीतर्फे ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सरच्या दोन मशिन देवस्थानला देण्यात आल्या आहेत. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, संतोष रणपिसे, पुजारी मकरंद कुलकर्णी व  प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com