नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी आंदोलन करणार : अतुल बेनके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

जुन्नर - (दत्ता म्हसकर) नारायणगाव बायपाससह जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गाचे रखडलेले काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिला आहे. 

जुन्नर - (दत्ता म्हसकर) नारायणगाव बायपाससह जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गाचे रखडलेले काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिला आहे. 

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.60 वरील जुन्नर तालुक्यातील काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. सध्या ठेकेदार कंपनी सुद्धा काम करत नसून, नारायणगाव बायपास, पिंपळवंडी ते आळेफाटा महामार्गाचे काम बंद  आहे. तालुक्यातील चाळकवाडी येथील टोलनाका मात्र सुरू आहे. नारायणगाव बायपासचे काम रखडल्यामुळे नारायणगावमधून बिकट अवस्थेत वाहतुकीचा सामना  करावा लागत आहे. रुग्णास पुण्यात नेण्यासाठी जिकिरीचे झाले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या प्रश्नासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नारायणगाव बायपास व महामार्गाचे काम येत्या १५ दिवसात सुरू झाले नाही तर चाळकवाडी येथील टोलनाका बंद पाडून आंदोलन करण्याचा इशारा अतुल बेनके व युवक तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांनी दिला आहे.

यावेळी NHAI नाशिक कार्यालय येथे प्रोजेक्ट डायरेक्टर कोडसकर यांना व आळेफाटा पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक डमाळे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रघुनाथ लेंडे, अतुल भांबेरे, अमोल भुजबळ, दिगंबर घोडेकर, इम्रान मणियार, ॠषीकेश गडगे, प्रितम काळे, विघ्नहर वाजगे, गौतम जांभळे आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Atul Benneke to do the agitation for the work of Nashik highway