दृष्टिहीनांचेही करिअर उज्ज्वल व्हावे, यासाठी विषयांचे ऑडिओ तयार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

ॲप करणार विकसित 
अंधांच्या मदतीसाठी ऑडिओचे ॲप तयार करायचे आहे. यासाठी खर्च मोठा आहे. यंत्रणाही हवी. यासाठी विनामूल्य काम करणारे आम्हाला हवे आहेत. मदत मिळाल्यास आम्ही हे ॲप लवकर विकसित करू, असे संकल्पना अमलात आणणाऱ्या डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी सांगितले.

पिंपरी - दृष्टिहीनांचेही करिअर उज्ज्वल व्हावे, यासाठी झपाटलेल्या १६ जणांनी एकत्रित येऊन बदललेल्या अभ्यासक्रमांच्या विविध विषयांचे ऑडिओ (श्राव्य) तयार केले. त्यातून त्यांनी दृष्टिहीनांना डोळसपणा प्राप्त करून दिला. स्मार्ट फोन आणि डिजिटलायझेशनमुळे त्यांची ऑडिओशी चांगलीच गट्टी जमली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडचे सदस्य व इतर महिलांनी २०१२ मध्ये हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम फक्त कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दर सात वर्षांनी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम बदलतो. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचे ऑडिओ मागील काही वर्षांत तयार केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत हा अभ्यासक्रम येत असल्याने तो पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिक, नगरमधील अनेक महाविद्यालयांत वापरला जातो. तो पेनड्राइव्ह, हार्डडिस्क, मोबाईल व संगणकामध्ये महाविद्यालय सेव्ह करून घेत आहेत. त्यानंतर अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या स्मार्ट फोनवर अभ्यासासाठी विषयाप्रमाणे दिले जातात. 

चाकणमध्ये कांदा २० रुपये किलो

या वर्षी प्रथम वर्षाच्या इंग्रजी, ऐच्छिक मराठी, हिंदी, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास या विषयांचे ऑडिओ तयार करण्याचे काम सुरू आहे. 

यांची झाली मदत
रोटरीचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, मनीषा समर्थ, मधुरा कुलकर्णी, सुनीता कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, धनश्री लेले, किरण लाखे, हर्षा जोशी, कविता खंडागळे, शुभदा गोडसे, पल्लवी कठापूरकर, ॲड. ज्योती सोरखाडे, ॲड. वंदना सोरखाडे, सोनाली तेंडुलकर, डॉ. मंजूषा धुमाळ, उज्ज्वला कुलकर्णी, धनंजय गोडसे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Audio visual of the subject to make the visually impaired career bright