esakal | कारखान्यांच्या सुरक्षेचे लेखापरीक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Factory

त्रुटी दूर करण्यासाठी ३ महिन्यांचा अवधी
एखाद्या कारखान्यात सुरक्षा विषयक उपाययोजनांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्यास संबंधित उद्योगाच्या व्यवस्थापनाला त्या त्रुटी दूर करण्याबद्दल कळविले जात आहे. कारखान्यांमधील त्रुटी ३ महिन्यांत दूर करण्याचेही निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

कारखान्यांच्या सुरक्षेचे लेखापरीक्षण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील ८५ रासायनिक, धोकादायक आणि इतर कारखान्यांच्या सुरक्षा विषयक लेखापरीक्षणास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, कारखाने निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभाग, एमआयडीसी आदी विभागांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त पथकांकडून प्रथमच हे सुरक्षा लेखापरीक्षण केले जात आहे. आत्तापर्यंत नऊ कारखान्यांचे सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही महिन्यांपूर्वी तारापूर एमआयडीसीमधील एका औषधे उत्पादन कंपनीला मोठी आग लागली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, राज्य शासनाने राज्यातील सर्व रासायनिक आणि धोकादायक कारखान्यांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मागील महिन्यापासून संपूर्ण राज्यभरात याप्रकारे संयुक्त पथकाद्वारे सुरक्षा लेखापरीक्षणाला सुरुवात झाली आहे. दर महिन्याला कारखाने निरीक्षक, कामगार कल्याण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कामगार अधिकारी यांच्या देखरेखीखाली संयुक्त पाहणी केली जाते. याव्यतिरिक्त हे सुरक्षा लेखापरीक्षण केले जात आहे.

SSC Exam : दृष्टिहिन विदयार्थ्यांना लेखनिकांचा आधार

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक हेमंत धेंड म्हणाले,‘‘राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार, रसायनतज्ज्ञ आणि एमआयडीसी अग्निशमन अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, कारखाने निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त पथकांकडून सुरक्षा विषयक लेखापरीक्षणाला सुरुवात झाली आहे. या पथकाकडून संबंधित उद्योग-कारखाने व्यवस्थापनाला औद्योगिक सुरक्षाविषयक उपाययोजना आणि सूचना केल्या जात आहेत.

एखाद्या कारखान्यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी, राज्य शासनाचा प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे पाहणी करत असे. परंतु, शासनाने प्रथमच सर्व विभागांच्या संयुक्त पथकाद्वारे प्रथमच सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.’’ 

पिंपरी-चिंचवड, हिंजवडी भागांतील सुरक्षा लेखापरीक्षणाला दहा दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. संयुक्त पथकाने आत्तापर्यंत ८५ उद्योग-कारखान्यांपैकी ९ कारखान्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. येत्या ६ महिन्यांत सर्व कारखान्यांचे लेखापरीक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य शासनाला दिला जाणार आहे.

loading image