पुणे : औंधमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, लॉकडाउन शिथिल होताच गुन्ह्यांत झाली वाढ!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

चोरट्यांनी रेनकोट, टोपी, हॅंडग्लोज, मास्कचा वापर केल्याचे चित्रीकरणात आढळून आले आहे.

पुणे : लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्यानंतर चोरीच्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागल्याचे चित्र आहे. औंध-बाणेर रस्त्यावरील परिहार चौकात रविवारी (ता.7) रात्री चोरट्यांनी नऊ दुकाने फोडली. त्यामध्ये एका दुकानातील रोख रक्कम आणि 27 हजार रुपयांची रोकड आणि वस्तू असा 54 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला. 

अमोल कोल्हे म्हणतात, कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवली पाहिजे

याप्रकरणी रमेश चौधरी (वय 34, रा. ऋषभ अपार्टमेंट, ग्रीनपार्क सोसायटी, औंध ) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे औंधमधील परिहार चौकात रमेश मिनी मार्केट नावाचे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री चौधरी फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानामध्ये प्रवेश केला. त्यांनी दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवलेली 27 हजार रुपयांची रक्कम आणि वस्तू असा 54 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. 

- ४९ वर्षांच्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवत घातला लाखोंचा गंडा; काय आहे हे प्रकरण?

दरम्यान, चोरट्यांनी परिहार चौकाच्या परिसरातीलच गो कलर्स, सनशाईन होजिअरी, एलेन सोली, शूज एक्‍सप्रेस, पूनम कलेक्‍शन, एशियन पेंट्‌स, बास्किन रॉबिन्स, गोकुळ स्वीटस या दुकानांचा दरवाजा उचकटून तेथील मालाची चोरी केली. सोमवारी सकाळी दुकाने फोडून चोरट्यांनी माल लंपास केल्याचे उघड झाले. व्यापाऱ्यांनी याबाबतची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

- राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आमदारांनी काय सल्ला दिला? वाचा सविस्तर!

पोलिसांनी परिहार चौक तसेच दुकानांच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात दोन चोरटे दुचाकीवरून परिहार चौकात आल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी रेनकोट, टोपी, हॅंडग्लोज, मास्कचा वापर केल्याचे चित्रीकरणात आढळून आले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ए. जाधव करीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Aundh nine shops robbed by thieves on Sunday midnight