औंध-सांगवी : मुळा नदीवरील पुल रहदारी साठी खुला

औंध सांगवी पुणे या भागाला जोडणाऱ्या मुळा नदीवरील श्रीमंत महादजी शिंदे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर धुळवडीच्या दिवशी तो प्रशासनाकडून खुला करण्यात आला आहे.
bridge
bridgeSakal

जुनी सांगवी : गेली दोन वर्षांपासून काम सुरू असल्याने रहदारीसाठी बंद असलेल्या औंध सांगवी पुणे या भागाला जोडणाऱ्या मुळा नदीवरील श्रीमंत महादजी शिंदे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर धुळवडीच्या दिवशी तो प्रशासनाकडून खुला करण्यात आला आहे. काम होवूनही हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. यामुळे विविध पक्ष संघटनांकडून हा पुल रहदारिसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी होत होती. तर स्थापत्य विभागाकडून येथे किरकोळ कामे सुरू असल्याचे सांगितले जात होते.

सांगवी फाटा येथून औंध परिहार चौक दिशेने जाणाऱ्या मुळा नदीवरील पुलाला ऑगस्ट २०१९ मध्ये अचानक भगदाड पडले होते. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल बंद करून पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने संयुक्तपणे पुलाच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती.

१९९५ साली बांधण्यात आलेल्या या पुलाची क्षमता, बांधकाम व रुंदी वाहतुकीसाठी धोकादायक ठरत होती. अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडीचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे या पुलाच्या जागी नव्याने अंदाजित रक्कम २९ कोटी रुपये खर्चाच्या कामाचा नवीन पूल बांधण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी संयुक्तपणे घेऊन सदर पुलाचे सुरू केले होते.

मुख्य पुलाची लांबी शंभर फूट तर दोन्ही बाजूला दीडशे फूट जोड दिली असून या नवीन पुलाला चार मोठे गाळे असल्याने प्रशस्त झाला आहे. एलईडी पथदिवे व इतर अद्ययावत सुविधा व सुचना, दिशादर्श फलक लावण्यात आले आहेत. सांगवी कडून पुणे व हिंजवडीकडे जाणा-या वाहतूकीसाठीही हा पुल उपयोगी ठरणार आहे. काम होवूनही रहदारी साठी बंद ठेवण्यात आलेल्या पुलावर धुळवड साजरी करत जुनी सांगवी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील बॅरिकेड्स हटवत हा रस्ता खुला केला आहे.

यावेळी माजी स्थायी अध्यक्ष अतुल शितोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.याआधीही गतमहिन्यात विविध पक्ष संघटनांकडून रस्ता खुला करण्याबाबत आंदोलने करण्यात आली होती. काम होवूनही केवळ उद्घाटनाअभावी वाहतूक सुरू करण्यात येत नसल्याच्या पक्ष संघटनांच्या तक्रारी होत्या. तर स्थापत्य विभागाकडून येथील किरकोळ कामे सुरू होती. रंगकाम, काही डांबरीकरण शिल्लक होते यासाठी खुला करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

काही किरकोळ कामे पुर्ण झाल्यानंतर रहदारिसाठी हा पुल खुला करण्यात आला आहे.

-राहुल परसे अभियंता स्थापत्य विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com