म्हाडाच्या परीक्षेतही घोटाळ्याचे ‘फुटेज’

औरंगाबादमधील परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही चित्रण समोर
mhada exam
mhada exam

पुणे : परीक्षेतील गैरप्रकार उघड झाल्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाची (म्हाडा) डिसेंबरमधील परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षेला अवघे काही तास बाकी असताना, मध्यरात्री स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा पुढे ढकलल्याचे घोषित केले. त्याचवेळी पारदर्शक परीक्षेचेही आश्वासनही दिले. मात्र जानेवारी-फेब्रुवारीत झालेल्या ऑनलाइन पुर्नपरीक्षेतही घोटाळा झाल्याचे ‘फुटेज’ आता समोर आले आहे.

औरंगाबाद शहरातील खोकडपुरा भागातील परीक्षा केंद्रावर केंद्रचालकांशी संगनमत करून परीक्षेच्या संगणकीय प्रणालीत फेरफार केल्याचा आरोप समितीने केला आहे. यासंबंधीची तक्रार समितीने पुराव्यानिशी म्हाडाकडे केली आहे. या तक्रारीनुसार टीसीएसकडून यासंबंधी स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. त्यानंतरच पोलिस तक्रार दाखल करण्याबाबतचा निर्णय म्हाडा घेणार आहे, अशी माहिती समितीने दिली. या घोटाळ्यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागले असून, यामुळे ही परीक्षा खरंच पारदर्शक पद्धतीने झाली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

फुटेजमध्ये काय ?

परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा केंद्राचा मालक, सुपरवायझर आणि काही उमेदवार केंद्रामध्ये शिरले. त्यांनी ऑनलाइन परीक्षा होणाऱ्या कॉम्प्युटर्सची छेडछाड केल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. परीक्षेच्या आधी केंद्र एजन्सीच्या ताब्यात असतं तरीही औरंगाबादच्या परीक्षा केंद्रावर हे घोटाळेबाज कसे घुसले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परीक्षा केंद्रात घुसलेल्या या लोकांनीच पेपरही लीक केल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या केंद्रावर सुपरवायझर उमेदवाराच्या शेजारी बसून त्याला परीक्षेची उत्तरं सांगताना दिसतो आहे.

व्यक्त व्हा?

मंत्र्यांनी स्वतः आश्वासन देऊनही परीक्षेत घोटाळा झाल्याचे आता समोर येत आहे. राज्यातील भरती प्रक्रियेतील या अनागोंदी बद्दल आपल्याला काय वाटते? याची जबाबदारी नक्की कोणी घ्यायला हवी? कळवा आम्हाला पुढील व्हॉट्सअप क्रमांकावर. क्रमांक ः ८४८४९७३६०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com