Pune News : होर्डिंग नूतनीकरणाचा नाही तर काढून टाकण्याचा प्रस्ताव पाठवा; अतिरिक्त आयुक्तांचे क्षेत्रीय कार्यालयास आदेश

संभाजी पोलिस चौकीच्या मागील नियमबाह्य होर्डिंग अधिकृत करण्यासाठी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून खटाटोप सुरु
authorised hoarding advertisement kasba office dr kunal khemnar pune marathi news
authorised hoarding advertisement kasba office dr kunal khemnar pune marathi newsesakal

Pune News : संभाजी पोलिस चौकीच्या मागील नियमबाह्य होर्डिंग अधिकृत करण्यासाठी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून खटाटोप सुरु आहे. मात्र, आता हे होर्डिंग अधिकृत करण्याचा प्रस्ताव न पाठवता, थेट काढून टाकण्याचाच प्रस्ताव पाठवा असे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाला अखेर कारवाई करावी लागणार आहे.

टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंग उभारण्यात आले आहेत. हे होर्डिंग उभे करताना दोन होर्डिंगमध्ये प्रत्येकी एक मीटरचे अंतर न सोडणे, झाडे तोडणे, राडारोडा टाकून नियमांचे उल्लंघन केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी हा प्रकार सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर ऑगस्ट महिन्यात होर्डिंगच्या कामाला स्थगिती देण्यात आली. तसेच जाहिरात प्रसिद्धीवर बंदी आणली आहे.

हे होर्डिंग उभारताना प्रत्यक्षात जागेवर काय स्थिती आहे याकडे दुर्लक्ष केल्याने कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित ही करण्यात आले होते. या होर्डिंगचा परवाना रद्द केला, त्यानंतर २० बाय १०० फूट असा महाकाय लोखंडी सांगडा महापालिकेने काढणे अपेक्षीत होते. पण गेल्या चार महिन्यात काढून टाकले नाही.

होर्डिंग व्यावसायिकाने ही जागा खासगी मालकीची असल्याचा दावा केला होता, पण अधिकाऱ्यांनी केलेल्या जागा पाहणीत ही जागा महापालिकेची असल्याचे समोर आले आहे. तरीही क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधित होर्डिंग व्यावसायिकास ११ महिने मुदतीने जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची हालचाल सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता.

त्यानंतर आता प्रशासनाने भूमिका बदलत हे होर्डिंग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, ‘‘संभाजी पोलिस चौकीच्या मागील होर्डिंग हे महापालिकेच्या जागेत आहे. ही जागा होर्डिंगसाठी द्यावी असा प्रस्ताव न पाठवता होर्डिंग काढून टाकण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत. ही जागा भाड्याने देण्यासंदर्भात त्यानंतर विचार केला जाईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com