#PuneMurder 20 रुपयांसाठी रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

रिक्षा चालकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने सदर इसमाला लाथाबुक्क्याने मारहाण करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आल्यानंतर रुग्णालयातून पळ काढलेल्या दोघा आरोपीना पोलिसांनी गजाआड केले. दरम्यान मारहाण झालेल्या इसमाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

पुणे : अवघ्या 20 रुपयांसाठी पुण्यातील गणेश पेठ परिसरात रिक्षा चालकाने प्रवाशाचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैशावरुन वाद झाल्यानंतर रिक्षा चालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिला एका रिक्षाचालकाने बनाव रचत आपल्याच रिक्षामधून पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेले. अखेर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

रिक्षा चालकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने सदर इसमाला लाथाबुक्क्याने मारहाण करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आल्यानंतर रुग्णालयातून पळ काढलेल्या दोघा आरोपीना पोलिसांनी गजाआड केले. दरम्यान मारहाण झालेल्या इसमाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. फक्त 20 रुपयांसाठी भाड्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण करून खून केल्याचे तपासात निष्पन्न  झाले. ही घटना शनिवारी (दि. १६) दुपारी गणेश पेठेत घडली.

Web Title: auto driver beaten passenger in Pune

टॅग्स