वडगाव शेरी - मुलाला डॉक्टर करण्यासाठी मागील वीस वर्षांपासून रिक्षा चालवून कष्ट उपसणाऱ्या एका रिक्षा चालकाचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. त्यांच्या मुलाला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी गुणवत्ते नुसार प्रवेश मिळाल्याने या रिक्षावाल्या काकांसाठी आकाश ठेंगने झाले आहे.