रिक्षा, प्रवाशांच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

रेल्वे स्टेशन आवारातील कोंडी फोडण्यासाठी विविध उपाय
पुणे - पुणे रेल्वे स्टेशन आवारात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिक्षांसाठी स्वतंत्र लेन उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरून दररोज 250 रेल्वे गाड्या आणि सुमारे एक लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे स्टेशनवर नेहमीच गाड्यांची गर्दी असते. रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वारातून परिसरात येणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांसाठी चार स्वतंत्र लेन आहेत. त्यात व्हीआयपी, पिकअप ऍण्ड ड्रॉपसाठी प्रत्येकी एक आणि रिक्षा, टॅक्‍सी व इतर वाहनांसाठी दोन लेन आहेत. मात्र सकाळी आणि संध्याकाळी स्टेशनवर होणाऱ्या प्रवाशांमुळे गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर उपाययोजना करावी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वेने मार्चमध्ये अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचे ठरवले होते. तो तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 
त्यानुसार रिक्षांसाठी तिकीट आरक्षण केंद्राजवळ असलेल्या राखीव जागेत स्वतंत्र लेन उभारण्यात येणार आहे. पूर्वी या ठिकाणी दुचाकींसाठी पार्किंग होते. मात्र, आता या ठिकाणी लेन तयार करण्यात येणार असल्याने दुचाकींचे पार्किंग एसटी बस आगाराच्या मागील बाजूस हलविण्यात आले आहे.

रिक्षांसाठी स्वतंत्र व्यवस्था झाल्यानंतर सध्या मुख्य गेटसमोर असलेल्या ऑटो लेनवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात या ठिकाणीही प्रीमियम पार्किंग उभारण्याचा विचार सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ऑटो लेनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Autos, separate lanes for passenger vehicles