esakal | विनित सिंह यांना ‘अवसर पुरस्कार’

बोलून बातमी शोधा

Vinit-Sinh

संशोधनाचे भविष्यातील महत्त्व
या संशोधनामुळे चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी अरबी समुद्र, बंगालचा उपमहासागर आणि हिंदी महासागराची भूमिका नेमकी कशी आहे, यासंबंधी माहिती मिळेल. या माहितीच्या आधारावर तंत्रज्ञानांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यास मदत मिळेल. तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची पूर्व सूचना देणाऱ्या प्रणालीमध्ये सुधारणा करता येईल.

विनित सिंह यांना ‘अवसर पुरस्कार’
sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे - जागतिक तापमानवाढीमुळे मॉन्सूनचे चक्र बदललेले आहे. याचा परिणाम देशाच्या कृषी क्षेत्रावर आणि त्यावर अवलंबून उद्योगांवर होत आहे. मॉन्सूनच्या कालावधीत झालेला बदल आणि महासागराच्या घडामोडींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ही गरज पाहता पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये (आयआयटीएम) पीएचडी करत असलेल्या विनित सिंह यांनी याचा अभ्यास केला आहे. या संशोधनात्मक अभ्यासासाठी नुकतेच केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे (डीएसटी) त्यांना ‘अवसर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

विज्ञानाच्या क्षेत्रात पीएचडी करत असलेल्या देशातील १०० विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. ‘बदलत्या हवामानामुळे उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळ’ या विषयावर करत असलेल्या संशोधनासाठी विनितला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारतात कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, मुंबई आदी किनारपट्टीवर दाट लोकसंख्या आहे. चक्रीवादळांमुळे या किनारपट्टीवरील जीवित आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यापूर्वी ऑक्‍टोबर १९९९ मध्ये ओडिशामध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे अशा प्रकारचा जीवित व मलामत्तेचे नुकसान झाले होते. मागील वर्षी बंगालच्या उपमहासागराच्या तुलनेत अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या संख्या सर्वाधिक होती.

पुणे : सांगवडेत अखेर 'त्यांची' परतभेट

दरम्यान ही संख्या वाढण्यामागचे कारणसुद्धा या संशोधनातून समोर आले आहे. त्यामध्ये वातावरणीय परिस्थितीबरोबरच समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान यासारख्या परिस्थितींमुळे वारंवारता आणि तीव्रता या चक्रीवादळाच्या वैशिष्ट्यांना नियंत्रित करण्यासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.

पीएचडीसाठी मला डॉ. रॉक्‍सी मॅथ्यू कोल आणि डॉ. मेधा देशपांडे यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. तसेच या संशोधनासाठी मला त्यांनी सर्व प्रकारे मदत केली आहे. या संशोधनामुळे बदलत असलेल्या हवामानामुळे चक्रीवादळांवर कशा प्रकारे परिणाम होतो याची माहिती मिळेल. त्याबरोबर भविष्यात याचा वापर करण्यासाठी उपयोगी ठरेल.
- विनीत सिंह, आयआयटीएम पीएचडी विद्यार्थी