जुन्नरच्या नागरिकांसह प्रशासनाला या अहवालाची... 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 22 मे 2020

मुंबईहून जुन्नरला आलेल्या एका कुटुंबातील पाचही जणांना एकाच वेळी कोरोना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते.

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील दोघांचे कोरोना तपासणीचे गेली दोन दिवस "होल्ड'वर ठेवलेले अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. त्यात आज दुपारी त्यांचे स्वॅब पुन्हा घेतले आहेत. त्यामुळे नागरिक व प्रशासन चिंतेत आहे.  

जुन्नर, जेजुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबईहून जुन्नरला आलेल्या एका कुटुंबातील पाचही जणांना एकाच वेळी कोरोना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले होते; तर दोघांचे अहवाल होल्डवर ठेवले असल्याची चर्चा होती. त्यात आज दुपारी त्यांचे स्वॅब पुन्हा घेतले आहेत. त्यामुळे नागरिक व प्रशासन चिंतेत आहे.  

कुरकुंभ येथील केमिकल साठ्याला आग

मुंबईहून जुन्नरला 14 मे रोजी पाच जणांचे कुटुंब राहण्यासाठी आले. त्यांना त्यांच्याच घरात होम क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या घरातील एक जण मुंबईला कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे येथील पाचही जणांना तीन रुग्णवाहिकेतून 19 मे रोजी एका वेळी तपासणीस नेण्यात आले होते. त्यानंतर गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यात दोघांचे रिपोर्ट होल्डवर ठेवले. त्यामुळे ते पॉझिटिव्ह आल्यास प्रतिबंधित क्षेत्र कसे करायचे, याचा विचार प्रशासनाकडून सुरू झाला होता. परिसरातील नागरिक चिंतेत पडले होते. त्यात आज दुपारी त्यांचे स्वॅब पुन्हा घेतले आहेत. त्यामुळे नागरिक व प्रशासन चिंतेत आहे.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्नर नगर पालिकेने होम क्वारंटाइनचे आदेश न पाळता गावभर भटकणाऱ्यांना संस्था क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला असून, काही जणांवर कारवाई केली आहे. आदेश न पाळणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awaiting this report to the administration along with the citizens of Junnar city