esakal | जुन्नर, जेजुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा
sakal

बोलून बातमी शोधा

swach bharat1.jpg

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत थ्री स्टार कचरामुक्त शहरांच्या यादीत जुन्नर व जेजुरी शहराने स्थान मिळविले आहे.

जुन्नर, जेजुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जुन्नर / जेजुरी (पुणे) : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत थ्री स्टार कचरामुक्त शहरांच्या यादीत जुन्नर व जेजुरी शहराने स्थान मिळविले आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी  विविध विभागांतील विजेत्या शहरांची नावे घोषित  केली. यातील एकूण चार हजार ५०० शहरांपैकी १४१  शहरांना स्टार मानांकन प्राप्त झाले. ७० शहरांना एक स्टार , ६५ शहरांना थ्री स्टार व  सहा शहरांना फाईव्ह स्टार मानांकन मिळाले. 

Video : कुरकुंभ येथे केमिकल साठ्याला आग; परिसरात धुराचे लोट

कचरामुक्त थ्री स्टार पात्र होण्यासाठी त्या शहराने किमान ODF+ असण्याची अट होती. त्याचप्रमाणे शहराची संपूर्ण वेस्ट प्रोफाईल शासनाने निर्देशित केलेल्या निरनिराळ्या स्तरांवर पात्र होणे आवश्यक होते. या सर्व गोष्टींची पूर्तता जुन्नर नगर पालिकेने केली तसेच  केंद्र शासनाच्या गटाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीच्या अहवालानुसार जुन्नर शहराने हे यश प्राप्त केले. यामध्ये शहराला वेगवेगळ्या २५ प्रकारच्या मापदंडांत अभ्यासले गेले. 

दिलासादायक बातमी : ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी झाली यशस्वी!​

स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ , २०१९ मध्येही जुन्नर शहराने उत्कृष्ठ कामगिरी केली होती व यावेळी आपला नंबर आणायचाच यासाठी नगरपालिकेने तयारी केली होती. आता मिळालेल्या मानांकनामुळे जुन्नर शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये चांगला गुणानुक्रम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निकालाची बातमी समजताच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

नगराध्यक्ष शाम पांडे यांनी  जुन्नरच्या जनतेचे यश असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे , आरोग्य प्रमुख  प्रशांत खत्री यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळे हे यश प्राप्त झाल्यामुळे परिसरातून जुन्नर पालिकेचे कौतुक होत आहे.

जेजुरीलाही तीन स्टार मानांकन 
२०१९ च्या स्पर्धेत जेजुरी शहराला २ स्टार मानांकन मिळाले होते. मागील वर्षीच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात आला. आरोग्य विभागाने कचरा संकलन, कचरा प्रक्रिया करून खात निर्मिती करणे, जुन्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, खत निर्मिती करून शिल्लक राहिलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेसाठी लँडफिल बनविणे यासारख्या कामावर भर देऊन सुधारणा केली आहे, असे मुख्याधिकारी पूनम कदम यांनी माहिती दिली. 

यापुढे देखील नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवणेसाठी घरातील, दुकानातील इत्यादी ठिकाणी निर्माण होणार कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा. स्वच्छतेचे नियम पाळावेत, असे आवाहन नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी केले आहे.