esakal | 'यस टू व्हॅक्सिनेशन, नो टू व्हेन्टीलेटर'; पुण्यात CYDA संस्थेकडून लसीकरणाबाबत जनजागृती

बोलून बातमी शोधा

'यस टू व्हॅक्सिनेशन, नो टू व्हेन्टीलेटर'; पुण्यात CYDA संस्थेकडून लसीकरणाबाबत जनजागृती
'यस टू व्हॅक्सिनेशन, नो टू व्हेन्टीलेटर'; पुण्यात CYDA संस्थेकडून लसीकरणाबाबत जनजागृती
sakal_logo
By
टीम ई सकाळ

सदाशिव पेठ (पुणे): कोविड-१९ चा वाढता प्रभाव पाहता आणि समुदायात कोविड लसीकरणाबद्दल उदासीनता पाहता. सेंटर फॉर युथ डेव्हलोपमेट अँड ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेने “यस टू व्हॅक्सिनेशन, नो टू वेन्टिलेटर” ही मोहीम हाती घेतली आहे. यात संस्थेचे स्वयंसेवक समुदायात आणि रुग्णालयात लसीकरणासाठी मदत कार्य करीत आहे. या मोहीमच्या माध्यामातून समुदायातील नागरिकांना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरणाचे महत्व पटवून देणे आणि नागरिकांना लसीकरण केंद्रांची माहिती देणे तसेच ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण झाले याची निश्चिती करणे, इत्यादी कार्य करीत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून समुदायातील ५०० पेक्षा अधिक व्यक्तींनी नाव नोंदवून लसीकरण केले आहे. त्याच प्रमाणे संस्थेचे स्वयंसेवक रुग्णालय स्थरावर सुद्धा कार्यरत आहे.

हेही वाचा: खळबळजनक! इस्लामपुरात रस्त्यावर विनाकराण फिरणारे 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

यात संस्था रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना लसीकरणाबद्दल माहिती देणे, लसीकरणासाठी नाव नोंदणी करणे, लसीकरणानंतर होणारे परिणाम तसेच घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत मार्गदर्शन करीत आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांनी एकूण १० लसीकरण केंद्रांच्या माध्यामातून १८ दिवसात 22000 पेक्षा अधिक नागरिकांना लसीकरणासाठी मदत कार्य केले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता संस्था पुढील काही दिवसात अधिक रुग्णालयात मदत कार्य करेल. सेंटर फॉर युथ डेव्हलोपमेट अँड ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेने मागील एक वर्षाच्या काळात पुणे महानगरपालिके सोबत अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत. कोविड-१९ दरम्यान संस्थेने “फ्लश द व्हायरस” या मोहिमेच्या माध्यमातून येरवडा, नगररोड, कोरेगाव पार्क आणि ताडीवाला या समुदायात अनेक सामाजिक कार्य केली. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सीवायडीए संचालक प्रवीण जाधव आशिष इंगोले, कौस्तुभ भामरे, युवराज बनसोडे, त्याच प्रमाणे संस्थेच्या 25 स्वयंसेवकांनी आपले योगदान दिले आहे.