कोरोनाशी लढण्यासाठी जगभरातील मराठी भाषिक पहा काय करतायेत...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

किमान एक कोटी मराठी भाषिकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे, यासाठी जगभरातील विश्व मराठी परिषदेचे समन्वयक कार्यरत आहेत.

पुणे : कोविड -१९ महामारीबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरातील मराठी भाषिक एकत्र आले असून, जगभरातील ४२ देशांतून, अमेरिकेतील २१ राज्यांतून आणि महाराष्ट्रासह भारतातील १२ राज्यांतून अनेक मराठी बांधवांच्या सहभागातून जगभरातील मराठी भाषिकांचा एकाच वेळी जागतिक कोविड - १९ महाजागर आजपासून सुरू झाला आहे. या उपक्रमामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आपला संदेश दिला आहे. 

अरे बाप रे, कोथरूड आता ग्रीन झोन नव्हे...तर रेड झोन

विश्व मराठी परिषदेच्या या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. सामान्य माणसांनी एकत्र येऊन कोविड - १९ विषयी एकमेकांना दिलेला मानसिक आणि भावनिक आधाराबरोबर शैक्षणिक जागृती, असे या महाजागराचे स्वरूप आहे. या उपक्रमात जागृती संदेश आज एकाच दिवशी नागरिक विविध सोशल मीडियांवर शेअर करत आहेत. पुढील ७२ तासात तो जगभर मोठ्या प्रमाणावर पाठवला जाईल. किमान एक कोटी मराठी भाषिकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे, यासाठी जगभरातील विश्व मराठी परिषदेचे समन्वयक कार्यरत आहेत. या उपक्रमाद्वारे कोविड – १९ काळातील जगभरातील मराठी बांधवांच्या संवादाचे एक महत्त्वपूर्ण असे दस्ताऐवजीकरण ( Documentation ) होणार आहे.

विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

या उपक्रमाचे नेतृत्व बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकाच्या अध्यक्षा विद्या जोशी करीत आहेत आणि बीएमएम कनव्हेंशन २०२१ चे मुख्य संयोजक आणि गर्जे मराठीचे संस्थापक सदस्य संदीप पाध्ये, तसेच विविध देशातील महाराष्ट्र मंडळे, सांस्कृतिक मंडळे, मराठी सामाजिक संस्था, मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन संस्था, मराठी कट्टे आदी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. अमेरिकेतील आर्सि फाउंडेशनने यासाठी विशेष सहाय्य केले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपक्रमात सहभागी होण्यासाठी                        या महाजागरामध्ये सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness of Kovid 19 from Marathi speakers from all over the world